लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षण प्रवण असलेल्या मोताळा तालुक्यासाठी जलक्रांतीकारी ठरू शकणाऱ्या ‘दरी तिथे बांध’ या ९८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास महसूल व वन विभागाने आठ मार्च २०१७ रोजी तत्वत: मान्यता दिल्यानंतरही शासनाने गेल्या दोन वर्षात निधी उपलब्ध करून दिला नाही. केवळ विरोधी पक्षाच्या सदस्याच्या मतदार संघात हा प्रकल्प होतोय या राजकीय आकसापोटी सत्ताधाऱ्यांकडून भेदभाव होत आहे, असा हल्लाबोल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.राज्यपालांच्या अभिभाषणावरील सुधारणा प्रस्तावावर बोलतांना ते आक्रमक झाले होते. विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची राज्यपालांची घटनात्मक जबाबदारी असतांना त्यांच्या अभिभाषणात या मुद्दयांचा उल्लेख नसल्याने आता राज्यपलांचे अभिभाषण सुध्दा अनुशेष निर्माण करणारे असल्याची कोपरखळी त्यांंनी मारली. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंढे यांचे सासर असलेल्या आपल्या मतदार संघातील मोताळा तालुक्याला भावनिक ऋणानूबंध असतांनाही विकास निधीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार दुर्देवी व दु:खदायक आहेत, असे ते म्हणाले.नेमका प्रकल्प आहे तरी काय?अजिंठा पर्वत रांगाची मोठी धूप होत आहे. येथे पाणीधरून ठेवणारा खडक नाही. त्यामुळे पावसाळ््यातील सर्व पाणी हे तापी खोºयात वाहून जाते. १९८१ च्या राज्यातील अवर्षण प्रवण तालुक्यात मोताळा समाविष्ट आहे.तालुक्यातील या डोंगरकडामध्ये एक हेक्टर मर्यादेत छोटे बांध उभारून हे पाणी जमिनीत मुरविल्यास तालुक्यातील जलपातळी वाढण्यासोबतच भूसंधारणही होईल. त्यासाठी २०० पेक्षा अधिक छोटे बांध डीपीआरमध्ये समाविष्ट आहेत. वनमंत्री यांनीही याचे प्रेझेंटेशन बघितले आहे.रस्ते विकासही बारगळलाभेदभावासंदर्भातील सभागृहात दाखले देतांना आ. सपकाळ यांनी बुलडाणा शहर रस्तेविकासाचा २० कोटीचा आराखडा, अर्थसंकल्पातील घोषणे नंतरही सुरू न झालेले कृषि महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत, ४६९ तीर्थक्षेत्रांसाठी किरकोळ निधी, २५ -१५ अंतर्गत विशिष्ट लोकांनाच देण्यात आलेले झुकते माप, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अत्यल्प निधी, अल्पसंख्यांक विकास कार्यक्रमांतर्गत निधीअभावी रखडलेली विकासकामे ही याची उदाहरणे असल्याचे ते म्हणो.
राजकीय आकसापोटी ९८ कोटींचा ‘दरी तिथे बांध’ प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 3:55 PM