बुलडाणा : १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानासाठी २ हजार ८१९ बॅलेट युनिट आणि २ हजार २00 कंट्रोल युनिट असे ५ हजार १९ मतदान यंत्रे तांत्रिकरित्या सज्ज करण्यात आली असून आज जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात ही मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहे. उद्या बुधवार ८ ऑक्टोबर रोजी या युव्हिएम मशीन्स्मध्ये उमेदवारांचा डाटा फिडींग करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात एकूण १९९१ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी २८१९ बॅलेट युनिट तर २२00 कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मतदान केंद्रांच्या १0 टक्के राखीव म्हणजे २५५ बॅलेट युनिट तर १९९ कंट्रोल युनिट ठेवण्यात आले आहेत. मेहकर आणि जळगाव जामोद मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ पेक्षा जास्त असल्यामुळे मेहकरमध्ये २९६ मतदान केंद्रावर ५९२ बॅलेट युनिट तर जळगाव जामोद मतदार संघातील २७0 मतदान केंद्रावर ५४0 बॅलेट युनिट देण्यात आले आहेत. याशिवाय कंट्रोल युनिट सुध्दा येथे अतिरिक्त देण्यात आले आहेत. येथील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवण्यात आलेली ही मतदान यंत्रे प्रत्येक मतदारसंघामध्ये आज रवाना करण्यात आली आहे. उद्या ८ ऑक्टोबर रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांचे नाव व चिन्ह या यंत्रांमध्ये फिड करण्यात येणार आहे. त्यांनतर बॅलेट पेपर लावून कोणत्या मशिन्स् कोणत्या मतदान केंद्रावर पाठवायच्या हे ठरविण्यात येणार आहे. तर १४ ऑक्टोबर रोजी मशिन मतदान केंद्रावर रवाना करण्यात येतील.
आज यंत्रांवर उमेदवारांचा डाटा फिडींग
By admin | Published: October 07, 2014 10:56 PM