शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

गिरडा मृत कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 3:48 PM

गिरडा येथे मृतावस्थेत आणून टाकलेल्या ९० कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने हातात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गिरडा येथे मृतावस्थेत आणून टाकलेल्या ९० कुत्र्यांचे प्रकरण आता चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने तातडीने याप्रश्नी ११ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी त्वरेने कारवाई करावी, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सध्या लक्ष लागून आहे.दरम्यान, मृत कुत्रे हे वाईल्ड लाईफच्या व्याख्याते येत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कोण करणारा असा प्रश्न उपस्थित होत होता. जिल्हा उप वनसंरक्षण संजय माळी यांनीच ही बाब अधोरेखीत केली होती. त्यामुळे ऐवढ्यामोठ्या प्रमाणावर मृत कुत्री आणून टाकल्याप्रकरणी नेमकी कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याबाबत प्रशासनाची संभ्रमावस्थाही समोर आली होती. ही बाब सात सप्टेंबर रोजी ‘लोकमत’नेच ही बाब प्रथमत: उजागर केली होती. प्रकरणी आता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने हे प्रकरण हातात घेतले आहे.दुसरीकडे बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे ११ सप्टेंबर रोजी धडक देत तेथून या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे. परिणाणी आता हे प्रकरण तपासाच्या दिशेने मार्गी लागल्याची चिन्हे दिसत आहे. यामध्ये दोन आरोपी हे पालिकेचे कंत्राटी कर्मचारी असून अन्य दोन जणांचा यात समावेश आहे. पाच आणि सहा सप्टेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील गिरडा गावालगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अज्ञातांनी ८० ते ९० मृतकुत्री आणून टाकली होती. त्यांचे मृतदेह हे डिकंपोज झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. त्याचा स्थानिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कुत्र्यांचे मृतदेह हे तेथेच खड्ड्यात पुरून टाकले होते. नंतर या प्रकरणात आठ सप्टेंबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात वनविभागाच्यावतीने तक्रार देण्यात आली. त्या आधारावर पोलिसांची तपास चक्रे सुरू झाली होती.या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर रोजी ही समितीची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा समिती सदस्य सचिन डॉ. पी. जी. बोरकर, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

तर पाच वर्षाची शिक्षाप्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्यातंर्गत अशा प्रकरणात दोषींना भारतीय दंड संहितेच्या कलम ४२९ नुसार पाच वर्षे कारावासाची शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. परिणमस्वरुपच पोलिस प्रशासनाने प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे अभिप्रेत असल्याचे समितीने स्पष्ट केले. 

कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार या समितीच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोकाट कुत्रे, गुरांचा बंदोबस्त करावा सोबतच पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन शिबीराचे आयोजन करावे तसेच भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी निर्बिजीकरण शिबीरे घेण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. तसेच मोकाट गुरे व कुत्र्यांची आरोग्य तपासणी करून रोग प्रतिबंदक लसिकरण सुद्धा केले जावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील पालिकांमध्ये कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी आता धडक मोहिम राबवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलforest departmentवनविभाग