- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात नवीन १२ ठिकाणी पुलांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. परंतू कोरोना विषाणू संसर्गाची बाधा पुलांच्या कामांनाही झाली आहे. निधी व कामगारांअभावी पुलाच्या कामांमध्ये व्यत्यय येत आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील धोकादायक पुलावरूनही सध्या जीवघेणी वाहतूकही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात आजही ब्रिटीशकालीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यातील बहुतांश पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश आहेत. काही पुलांच्या दुरूस्तीची कामे प्रस्तावीत आहेत. पुलांच्या कामांना कोरोनामुळे निधी मिळाला नसल्याने अडचणी येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जवळपास एप्रिलपासून पुलाच्या नवीन कामांना सुरूवात करण्यात आलेली नाही. प्रमुख जिल्हा मार्गावरील ११ पुलांना व इतर एक अशा एकूण १२ पुलांच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. या पुलाच्या कामांना सध्या सुरूवात करण्यात आलेली नाही.जिल्ह्यातील ऐतिहासीक राहेरी पुलावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे; तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन करून या पुलावरूनही जडवाहतूक सुरूच आहे. दुसºया मार्गाने दूर पडत असल्याने काही वाहन चालक या पुलावरूनच वाहने टाकतातच.
आठ कामे पूर्ण २१ प्रगतीपथावरपुलांच्या जुन्या कामांपैकी घाटावरील आठ पुलांची कामे पूर्ण झालेली आहेत. तर २१ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये राज्य महामार्गावरील तीन कामांचा समावेश असून हे तीनही कामे प्रगतीपथावर आहेत. प्रमुख जिल्हा मार्गावरील सात कामे असून, एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे, तर सहा पूल प्रगतीपथावर आहेत. नाबार्ड अंतर्गत १९ कामांचा समावेश आहे. त्यातील सात कामे पूर्ण झाले असून, १२ कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्ह्यातील पुलांच्या नवीन कामांना सध्या कोरोना संसर्गामुळे सुरूवात केलेली नाही. ज्या ठिकाणी जुने कामे सुरू आहेत, तीच सध्या पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडीट झाले आहे. त्यानुसार कुठलाही पूल धोकादायक नाही. जुन्या कामातील बरीचशी कामे आता प्रगतीपथावर आहेत.-चंद्रशेखर शिखरे,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलडाणा.