लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची ३८८ वी पुण्यतिथी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांना मानवंदना देऊन २५ जुलै रोजी साजरी करण्यात आली.यावेळी राजे लखुजीराव जाधव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव जाधव यांनी त्या काळातील महाराष्ट्रातील मराठा सरदार यांना मतभेद विसरून एकत्र आणले व मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीला राज्यात उपराजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी त्या काळी विकासाची अनेक कामे केली. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी तलाव, धरण बांधले. या परिसराला त्यांनी समृद्ध बनविले. त्यामुळेच राजे लखुजीराव जाधव यांची जगातील सर्वात मोठी समाधी बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष अॅड.नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, सीताराम चौधरी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब बुरकूल, महेश पवार, संजय मेहेत्रे, मोहनसिंग संभाजीराव राजे जाधव, मधुकर जाधव, बाळासाहेब राजे जाधव, डॉ.दत्तात्रय राजे जाधव, डॉ. श्रीकांत राजे जाधव, सतीश राजे जाधव, उमेश इंगळे, जी.डी. देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.नगर परिषदेमध्ये अभिवादनसिंदखेडराजा न.प.च्यावतीनेसुद्धा न.प. कार्यालयामध्ये लखुजीराव जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व फुले वाहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अॅड.नाझेर काझी, देवीदास ठाकरे, शिवाजी राजे जाधव, सीताराम चौधरी सर्व नगरसेवक व न.प. कर्मचारी उपस्थित होते.
राजे लखुजीराव जाधव यांची पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:14 AM
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची ३८८ वी पुण्यतिथी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांना मानवंदना देऊन २५ जुलै रोजी साजरी करण्यात आली.यावेळी राजे लखुजीराव जाधव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव ...
ठळक मुद्देमातृतीर्थ नगरीत विविध कार्यक्रम