धाड (बुलडाणा): तालुक्यातील चिखला घाटात मोटरसायकल आणि कारची समोरासमोरील धडक झाली. यात तिन वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजेच्या सुमारास बुलडाणा-धाड मार्गावर घडली. जालन जिल्ह्यातील पारध येथील रहीवासी शे.जलील शे.इस्माईल (६५) हे त्यांची सून शकीला बानो शे.अकील(२५) हीचा उपचारासाठी एमएच २१ एजी २१३९ क्रमांच्या मोटरसायकलने बुलडाणाकडे येत होते. त्यांच्या सोबत त्यांची तिनवर्षीय नात नमरा शे.अकील होती. या दरम्यान चिखला घाटात समोरुन भरधाव येणार्या एमएच २0 यु ६७१४ क्रमाकांच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरुन खाली पडून नमरा या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर शे.जलील आणि शकीला बानो हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
अपघातात बालिकेचा मृत्यू
By admin | Published: December 12, 2014 12:48 AM