लोकमत न्यूज नेटवर्कवडगावतेजन : येथील ५ वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली.येथील संतोष कोंडू सिरसाट यांची ५ वर्षाची साक्षी संतोष सिरसाट या चिमुकलीला गेल्या २-३ दिवसांपासून ताप येत असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला औरंगाबाद येथे नेण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या वडगाव तेजन येथील आरोग्य केंद्राची इमारत डॉक्टर नसल्यामुळे शोभेची वास्तू बनली आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही इमारत तयार असून, या काळात दोन ते तीन वर्ष येथे डॉक्टरचे वास्तव्य राहिले. हे गाव नदीकाठी असल्याने या गावामध्ये डॉक्टर नियमित रहायला पाहिजे; मात्र ग्रामीण भाग असल्यामुळे येथे डॉक्टर राहण्यास तयार नसतात. त्यामुळे गावातील रुग्णांना याठिकाणी वेळेवर प्रथमोपचार मिळू शकत नसल्याने या चिमुकल्या मुलीसारख्या रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात, तरी येथे निवासी डॉक्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकर्यांकडून करण्यात येत आहे.
डेंग्यूसदृश तापामुळे चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:25 AM
वडगावतेजन : येथील ५ वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली.
ठळक मुद्दे५ वर्षाची साक्षी संतोष सिरसाट २-३ दिवसांपासून ताप येत असल्याने औरंगाबाद येथे नेण्यात आलेउपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला