बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनामुळे आणखी दाेघांचा मृत्यू झाला असून, ४३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ४१ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, २ हजार ९५४ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय, बुलडाणा येथे वर्दडी, ता. सिं. राजा येथील ३८ वर्षीय पुरुष व पिंप्री खंडारे, ता. लोणार येथील ३२ वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ४, बुलडाणा तालुका दत्तापूर १, चिखली तालुका शेलसूर १, इसरूळ १, गांगलगाव २, नायगाव १, बेराळा २, नांदुरा तालुका इसापूर २, मलकापूर शहर २, मलकापूर तालुका उमाळी १, दसरखेड १, मोताळा तालुका शेलापूर १, शेगाव शहर १, शेगाव तालुका मनारखेड १, जानोरी १, भोनगाव १, संग्रामपूर तालुका अकोली खु. ३, कवठळ १, खामगाव तालुका तांदूळवाडी १, दे. राजा शहर १, दे. राजा तालुका सरंबा १, जांभोरा १, पांगरी १, माळेगाव १, भिवगण १, सिं. राजा तालुका वाकड १, किनगाव राजा २, जळगाव जामोद शहर २, जळगाव जामोद तालुका आसलगाव १, मेहकर तालुका मोहतखेड १, लोणार शहर १ व परजिल्ह्यातील एकाचा समावेश आहे़
६५८ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आज रोजी १०९० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५ लाख ६१ हजार ८६ आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ८६ हजार ४८४ कोरोनाबाधित रूग्ण असून, त्यापैकी ८५ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ११० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.