लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई : अवघ्या ३० वर्षाच्या नातवाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या धक्क्याने आजीनेही प्राण सोडल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली. २० मार्चला तरुणाचा मृत्यू झाला होता. सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २० मार्चला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ६५ वर्षीय आजीनेही नातवाच्या वियोगात प्राण सोडले.त्यामुळे सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे. २० एप्रिलला गावातील ३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर या तरुण मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याच्या निधनाचे वृत्त व त्याचा वियोग पचवू न शकलेल्या आजीनेही अचानक प्राण सोडले. त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबावर एका दिवशी दोन मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, शेतात ज्या ठिकाणी नातवाचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच जागेवर आजीचाही अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी केला. दरम्यान, दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून, बुधवारी बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे नातवाचा मृत्यू; वियोगात आजीनेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:00 PM
Death of grandchild by corona; Grandmother also gave up her life : २० एप्रिलला गावातील ३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
ठळक मुद्दे३० वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाला.६५ वर्षीय आजीनेही नातवाच्या वियोगात प्राण सोडले.