नीलेश जोशी, बुलढाणा : शहर परिसरात गेल्या अडीच महिन्यापासून शेकडो वराहांचा होत असलेला मृत्यू हा आफ्रिकन स्वाईन फिवरने होत आहे. भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीस’ संस्थेचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालायस प्राप्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूत यांनी या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी बुलढाणा शहरातील एक किमीचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
दरम्यान बुलढाणा शहराचा दहा किमीचे परीघक्षेत्र प्रभावित क्षेत्र गृहीत धरून पालिकेच्या माध्यमातून दहा सदस्यी पथकाद्वारे वराह नष्ठ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोबतच आफिक्रन स्वाईन फिवरच्या निर्मूलनासाठी हा परिसर निर्जंतूकीरण करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या पट्ट्यात जैव सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला देण्यता आले आहे. वराहांच्या मासविक्री आस्थापनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन सनियंत्रण करण्यात यावे असा स्पष सुटना दिल्या गेल्या आहेत. मोकाट पद्धतीने होणारे वराह पालन टाळण्यात यावे असे स्पष्ट करण्यता आले.
हॉटेल व्यवसायातील वाया गेलेले अन्न देण्याचे टाळा
हॉटेल व्यवसायातील वाया गेलेले अन्न वराहांना टाकण्याचे टाळण्याचा सल्लाही अनुषंगीक आदेशात प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते यांनी दिला आहे. प्रामुख्याने हे संक्रमणाचे कारण ठरू शकते असेही अनुषंगीक आदेशात म्हंटले आहे. सोबतच याच्याशी संबंधित सर्व यंत्रणांनी आपशी समन्वय ठेवण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पालिकेचे पथक नियुक्त
बाधीत एक किमीच्या परिघातील वरहांचे कलींग अर्थात हे वराह शास्त्रीदृष्टीकोणातून नष्ट करण्याचे काम बुलढाणा पालिकेने सुरू केले आहे. त्यासंदर्भाने दहा सदस्यी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
२६ ऑगस्टला पाठवले होते नमुने
गेल्या अडीच महिन्यापासून बुलढाण्यातील वराहांचा या आजाराने मृत्यू होत होता. त्यानुषंगाने मृत वराहांचे शवविच्छेदन करून त्यातील काही नमुने हे ‘निसाद’ला पाठविण्यात आले होते.
मानवी आरोग्याला धोका नाही
आफ्रिकन स्वाईन फिवरचा मानवी आरोग्याला धोका नाही. वरांना नष्ट करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे बुलढाणा पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.