बुलडाणा: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा १४ ऑगस्ट रोजी पहाटे दरम्यान मृत्यू झाला. १० ऑगस्ट रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
बुलडाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीस येथील स्त्री रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. प्रारंभी त्याचा स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्याची कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली होती. त्यामुळे पन्हा त्याचा तीन ते चार टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्यानंतर त्याला स्वाइन फ्ल्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे १० ऑगस्ट पासून त्याच्यावर जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. प्रारंभी व्हेंटिलेटरवर असलेल्या या रुग्णाची प्रकृती काहीशी स्थिर झाली होती. मात्र पु्हा प्रकृती खालावल्याने १४ ऑगस्ट रोजी पहाटे दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी स्पष्ट केले.
ही आहेत स्वाईन फ्ल्यूची लक्षणेरुग्णास उच्च ताप येतो, घसा खवखव करतो, नाक गळते, हातपाय दुखतात अशी प्रमुख लक्षणे आहेत. साधारणत: कोविड प्रमाणेच त्याची लक्षणे असून ज्या प्रमाणे कोविड संदर्भात आपण काळजी घेतली त्याच पद्धतीने याच्या तापापासूनही सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. भागवत भुसारी यांनी स्पष्ट केले आहे.