लोकमत न्यूज नेटवर्कसैलानी : सैलानीयेथील दर्गा परिसरातील नाल्यात बुडून एका मनोरुग्ण युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १६ जून रोजी सायंकाळी घडली.फारूखअली मोहंमद विक्रमअली असे मृत युवकाचे नाव आहे. निजामाबाद येथील रहिवासी असलेला फारूखअली हा मनोरुग्ण होता. तो भावासोबत येथे उपचारासाठी आला होता. दरम्यान १६ जून रोजी सायंकाळी दग्यापार्सून जवळच असलेल्या नाल्यामध्ये पडून फारूखचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार पोलिस पाटील रामेश्वर गवते यांनी पोलिसांत दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास एएसआय यशवंत तायडे शेख कय्यूम हे करत आहेत.
नाल्यात बुडून मनोरुग्ण युवकाचा मृत्यू
By admin | Published: June 18, 2017 7:18 PM