शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 10:45 AM

Death of a technical staff of ST who was consumed poisoned विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव  यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले होते.

ठळक मुद्देआंदोलनादरम्यान केले होते विष प्राशन   संपकरी कर्मचारी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव (जि. बुलडाणा): एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान विष प्राशन केलेल्या विशाल अंबलकर यांचा गुरूवारी रात्री अखेर मृत्यू झाला. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योम मालवली. त्यांच्या निधनामुळे एसटी कामगारांवर शोककळा पसरली आहे.एसटी कर्मचाºयांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपादरम्यान, विविध एसटी आगारासमोर परिवारासह आंदोलन केले जात आहे. अशातच संपकरी कामगारांना महामंडळाकडून निलंबित केले जात आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान,  खामगाव येथील सहा. मॅकेनिक या पदावरील यांत्रिक कर्मचारी विशाल अंबळकर(२९) रा. माटरगाव ता. शेगाव  यांनी बुधवारी रात्री १० वाजता विषारी औषध प्राशन केले.  गंभीर अवस्थेत त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यामुळे गुरूवारी रात्री त्यांना तात्काळ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान अंबळकर यांचा मृत्यू झाला.  या घटनेची माहिती मिळताच संपकरी एसटी कर्मचाºयांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावST Strikeएसटी संप