लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : दुचाकीवरून पडल्याने साखरखेर्डा येथील एक युवक गंभीर जखमी झाला हाेता. त्याचा १ जून राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पवन गणेश शिराळे असे मृतकाचे नाव आहे. साखरखेर्डा येथील पवन गणेश शिराळे हा एका मित्रासोबत रोहडा येथे गेला होता. परत येत असताना तो मागच्या मागे मोटारसायकलवरून पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. अपघातानंतर पवनला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले होते. परंतु फुटपाथवर मोलमजुरी करणारे गणेश शिराळे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने आणि सतत लाॅकडाऊन असल्याने पवनकडे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. मित्र परिवार आणि साखरखेर्डा येथील व परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हातही दिला. मात्र, मृत्यूशी पाच दिवसांपासून झुंज देणाऱ्या पवनची १ जून रोजी प्राणज्योत मालवली.
अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 11:29 AM