लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाद्वारे घोषीत कर्जमाफीबाबत अद्याप शे तकर्यांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, कर्जमाफीच्या निकषात दररोज बदल होत असून, हे निकष अन्यायकारक असल्याची टिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी बुलडाणा येथे शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. याबाबत महसूल व कृषी खात्यामार्फत परिस्थितीची माहिती घेवून येणार्या संकटावर मात करण्यासाठी दुबार पेरणीचा खर्च द्यायला पाहिजे, याबाबत मुख्यंमत्र्यांना आमचे शिष्टमंडळ भेटून मागणी करणार असल्याचे मेटे यांनी सांगीतले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबात शेतकर्यांची मते जाणून घेण्यासह पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांवरील संकटाचा आढावा घेण्यासाठी ह्यशिवसंग्रामह्णच्यावतीने दौरा काढण्यात आला असल्याची माहिती मेटे यांना दिली. तरूण बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची लवकर पुर्नरचना करून कर्ज वाटप करावे, अशी मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप लोड, जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, महिला अध्यक्ष वंदना निकम उपस्थित होत्या.
कर्जमाफीचे निकष अन्यायकारक
By admin | Published: July 09, 2017 9:52 AM