लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील शहर पोस्टेच्या आवारात पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत खामगाव गणेश विसर्जन मिरवणूकीतील क्रमवारी जाहिर करण्यात आली. यावेळी मानाचा लाकडी गणपती, तानाजी व्यायाम मंडळ, हनुमान व्यायाम मंडळ व राणा मंडळ वगळता शहरातील उर्वरित २४ मंडळांची चिठ्याद्वारे क्रमवारी जाहीर करण्यात आली. या सभेला एएसपी श्याम घुगे, डीवायएसपी प्रदीप पाटील, शहर पोस्टेचे ठाणेदार संतोष ताले, शिवाजीनगरचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्यासह गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लहान मुलांच्या हातून चिठ्या काढून ड्रॉ काढण्यात आला. त्यानुसार मानाचा लाकडी गणपती, तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, राणा गणेश मंडळ, त्रिशुल गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ, जय गजानन गणेश मंडळ, जगदंबा गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, जय संतोषी मॉ गणेश मंडळ, रामदल गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, स्वामी गणेश मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, दत्तगुरु गणेश मंडळ, सिंधी गणेश मंडळ, सराफा गणेश मंडळ, चंदनशेष गणेश मंडळ, तेलगुराज गणेश मंडळ, जगदंबा गणेश मंडळ (२), वंदेमातरम गणेश मंडळ, क्रांती गणेश मंडळ, अमरलक्ष्मी गणेश मंडळ, नेताजी गणेश मंडळ, मॉ आत्मशक्ती गणेश मंडळ, श्रीकृष्ण गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ असा प्राधान्यक्रम मिरवणूकीदरम्यान असणार आहे. (प्रतिनिधी)
खामगाव गणेश विसर्जन मिरवणुकीतील क्रमवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:15 IST