संत रविदास यांचा जन्म १३७७ वाराणसीमध्ये झाला आहे. संत रविदास महाराजांनी भारतभर फिरून महान कार्य केले असून, समाजसुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण पदवी मिळवली होती. ते महान कवी होते. त्यांचा गुरु ग्रंथ आजही लोकप्रिय आहे. संत रविदास १५/१६ व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय कवी होते. संत रविदास यांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात कायम प्रभाव पडला आहे. हे कवी संत समाजसुधारक आणि आध्यात्मिक होते. गुरु ग्रंथ साहिब या शिख धर्मग्रंथांमध्ये रविदासाच्या भक्तिगीतांचा समावेश होता. संत रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक मतभेद रविदास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्तात एकतेला प्रोत्साहन दिले. अशा महान संताच्या जयंतीला शासकीय सुटी जाहीर करून महाराष्ट्र शासनाने सन्मान वाढवावा, अशी मागणी विजय खरे यांनी केली आहे.
संत रविदास महाराज जयंतीला शासकीय सुटी जाहीर करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:35 AM