वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा
डाेणगाव : बस स्थानकासमाेर वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल असे वाहन उभे केल्याने चालकाविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास डाेणगाव पाेलीस करीत आहेत.
सहकार विद्या मंदिरातून एवज लंपास
डाेणगाव : येथील सहकार विद्या मंदिरातून चाेरट्यांनी एलईडी टीव्ही व प्राेजेक्टर लंपास केल्याची घटना १९ ते २० जुलैदरम्यान घडली़ या प्रकरणी प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डाेणगाव पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेचा छळ, सासरच्यांविरुद्ध गुन्हा
बिबी : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपी पती संदीप रंगनाथ खांडेभराड, सासू सिन्दुबाई रंगनाथ खांडेभराड, सासरा रंगनाथ नारायण खांडेभरा, दीर संतोष रंगनाथ खांडेभराड, जाऊ रुख्मिनाबाई संतोष खांडेभराड, ननंद सुनीता दत्ता घायाळ, नंदाेई दता उमाजी घायाळ, अलका विजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बसस्थानकावरील हिरकणी कक्ष बंदच
बुलडाणा : स्तनदा मातांना बाळांना दूध पाजण्यासाठी बसस्थानकावर हिकरणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र, हा कक्ष नेहमीच बंद असल्याने स्तनदा मातांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रस्त्यांवर साचला चिखल
बुलडाणा : शहरा लगत असलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायतींच्या हद्दीत अनेक ठिकाणी चिखल साचला आहे. काही भागात अजूनही रस्ते बांधलेले नसल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पीक कर्ज वाटपाची गती मंदावली
बुलडाणा : खरीप हंगाम सुरू हाेऊन दाेन महिने लाेटले तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे़ पीक कर्ज वाटपाची गती मंदावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुख्य रस्त्यावर गुरांचा ठिय्या
माेताळा : शहरातील मुख्य रस्त्यावर माेकाट गुरांचा ठिय्या राहत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. गुरांमुळे अपघात हाेण्याची शक्यता असल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.