धाड येथील एकूण सहा प्रभागांत ३६ उमेदवारांनी आपले राजकीय भवितव्य अजमावले होते. त्यापैकी वॉर्ड क्र. १ मधून अभिजित रामेश्वर तायडे, चंद्रकला सुरेश आघाव, अभिमन्यू अर्जुन तायडे. वाॅर्ड क्र. २ मधून किरण शालिग्राम सरोदे, विद्या धनंजय गुजर, सादिया बी टीका खान. वाॅर्ड क्र. ३ अजीमबी अ. रफिक, समीरानाज शे. आसीफ. वाॅर्ड क्र. ४ मधून मो.रिझवान सुलतान सौदागर, कल्पना प्रभाकर जाधव, खातुनबी सैय्यद गफ्फार.
वाॅर्ड क्र. ५ मधून वैशाली शरद बावसकर, निदा फईम, व शेख राईस.
वाॅर्ड क्र. ६ मधून सावित्रीबाई सत्यवान बोर्डे, उषा संजय बोराडे, नाजेमानाज इमरान पठाण.
यांना विजय मिळाला असून याठिकाणी निवडणूक निकालानंतर गावात शांतता होती. तसेच ग्राम चांडोळ या ठिकाणी सहा वाॅर्डातून १७ उमेदवार विजयी झाले आहेत. वाॅर्ड क्र.१ मधून देवकन्या राजू धनावत, सुनील देवसिंग मेहेर, कविता भरत पाकळ. वाॅर्ड क्र.२ मधून मनीषा शिवाजी पाचारणे, गजानन भोसले, राजेंद्र चांदा.
वाॅर्ड क्र. ३ मधून रामराव जाधव, फैमीदाबी लालखाँ पठाण.
वाॅर्ड क्र. ४ मधून निर्मला वसंतराव देशमुख, बबन दिलीप मोरे, निलोफर सय्यद कलिम. वाॅर्ड क्र. ५ मधून सागर सुभाष जयस्वाल, निर्मला देवसिंग ब्राह्मणे, परवीनबी महंमद अली. वाॅर्ड क्र. ६ मधून कविता दिलीप उसारे, कमलबाई जनार्दन सोनुने, नलिनी मदन जवंजाळ हे उमेदवार विजयी ठरले आहेत. निवडणूक निकालानंतर भागात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, तर विजयी आणि पराभूत उमेदवार व समर्थकांनी शांतता, संयम यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने खेळीमेळीच्या वातावरणात ग्रा.पं. निवडणूक पार पडली आहे.