अमडापूर/उंद्री : उन्द्री येथील ग्रा.पं.चे व्यापारी गाळे खाली करण्यास दिरंगाई करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
व्यापारी गाळ्यांच्या करारनाम्याची मुदत संपल्यामुळे तसेच करारनाम्याचे उल्लंघन झाल्यामुळे ग्रा.पं.ने. गाळे खाली करून घ्यावेत याकरिता रफिक शेख, राजीक खानव इतर यांनी ग्रा.पं.समोर उपोषण केले होते. त्यावेळच्या लेखी पत्रानुसार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प., बुलडाणा यांनी गाळे खाली करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले हाेते; मात्र त्याकडे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. उंद्री ग्रा.पं.चे व्यापारी गाळे अनेक वर्षांपासून ज्या व्यापाऱ्यांना दिले होते ते त्यांच्याच ताब्यात असून, ग्रा.पं.ला भाडे न भरता परस्पर हे गाळे दुसऱ्या व्यापाऱ्यांना भाड्याने दिलेले आहेत़. या गाळ्यांचे भाडे व्यापारी स्वतःच वसूल करत आहेत. करारनाम्याची मुदत संपली असतानाही ते खाली करण्यात आलेले नाही़त. त्यामुळे ग्रामस्थांनी २४ मार्चराेजी उपाेषण केले हाेते. त्यावेळी गटविकास अधिकारी, पं. स., चिखली यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण सुटावे म्हणून लेखी पत्र दिले होते. तसेच ग्रामविकास अधिकारी दीपक गिर्हे यांनीसुद्धा गाळे खाली करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. तसेच उपमुख्याधिकाऱ्यांनीही पत्र दिले हाेते. मात्र, तरीही हे गाळे खाली करण्यात आलेले नाही़त. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रफिक शेख, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, चिखली तालुका तथा ग्रामपंचायत सदस्य उन्द्री, राजीक खान शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उन्द्री व इतरांनी केली आहे.
ग्रामपंचायतींचे आर्थिक नुकसान
करार संपूनही अनेक व्यापारी गाळे खाली करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे या गाळ्यांना दुसऱ्या व्यापाऱ्यांना भाड्याने ोदेऊन त्याचे भाडे वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हाेत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.