यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन असणारे पत्रच त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यात हा निर्णय शेतकऱ्यांना परवडणारा नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर होईल, असे खा. जाधव यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या ६,५०० रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र डाळ आयात केल्यास यात मोठी तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांना फटका बसेल, असे खा. जाधवांचे म्हणणे आहे. आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात २५ ते ३५ टक्के घसरण होईल. मे २०२१ पर्यंत तूरडाळीचे एकूण उत्पादन पाहून आयात धोरण निश्चित केले जावे. तोपर्यंत तूरडाळ आयातीची परवानगी थांबवावी, अशी खा. जाधव यांची मागणी आहे.
तूरडाळ आयातीचे धोरण बदलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:48 AM