बुलडाणा: पावसाळा सुरू होऊन दोन दीड महिना उलटला आहे, मात्र अद्याप पेरणीयुक्त पाऊस न झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पेरणी अभावी शेतकर्यांची आता बाजारात पत राहीली नाही. शेतीचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता शेतकर्यांना झेपावने कठीण झाल्याने शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घ्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अँड. दत्ता भुतेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंंत खरिपाच्या पेरण्या होतात. पावसाअभावी उडीद, मूग, सोयाबीन, कपाशी या धान्याच्या पेरणीची मुदत संपली आहे. विशेष म्हणजे यावर्षी शेतकर्यांना पीक कर्ज तर सोडाच, शेतकर्यांच्या घामाचा असलेला जिल्हा बँकेतील पैसासुद्धा मिळाला नाही. लोकप्र ितनिधीचे धोरण हे शेतकर्यांच्या बाजूला नसल्याचा आरोपही भाई भुतेकर यांनी निवेदनात केला आहे.
बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
By admin | Published: July 12, 2014 12:01 AM