ग्रामपंचायत रोहणाच्या उपसरपंच अनिता रामप्रसाद डोके व सदस्य संतोष जनार्दन कदम यांनी वारंवार गट विकास अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा यांना तक्रारी दिलेल्या आहेत़ त्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. गाव पातळीवर उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता व त्यांच्या नावाने खोट्या सह्या करून खोटे व बनावट ठराव पारित करण्यात येत आहेत. गावात जे विकास कामे होत आहे ते फक्त कागदावरच होत असल्याचा आरोप उपसरपंच व ग्राम सदस्य यांनी केला आहे. ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये विकास कामांची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर भारतीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काकडे, जिल्हा सचिव जाकेरा बी. शेख कलाम, जिल्हा संघटक संतोष कदम, उपसरपंच अनिता रामप्रसाद डोके, चिखली तालुका अध्यक्ष दिनेश आढवे, तालुका सचिव कल्पना केजकर आदींची स्वाक्षरी आहे.
राेहणा गावात झालेली विकासकामे नियमानुसारच झाली आहे़ गावातील अंतर्गंत राजकारणातून ही तक्रार करण्यात आली आहे़ या तक्रारीत काहीही तथ्य नाही़ ग्रामपंचायतचे ठराव सर्वांना विश्वासात घेउनच घेतले जातात़ तक्रारीत केलेले आराेप चुकीचे आहेत़
शारदा नवले, ग्रामसेविका, राेहणा