शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेताचा पीक पेरा स्वत: मोबाइलवरून नोंद करावा, पिकाचे फोटो अपलोड करण्याबाबत आदेश आहेत. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याजवळ अँड्रॉइड मोबाइल नाहीत आणि मोबाइल असला तरी बरेच शेतकरी असुशक्षित असल्याने साइट चालवता येत नाही. ओटीपी येत नाही. नेटवर्कच्या अडचणी आहेत, अशा अनेक समस्या ई-पीक पाहणीच्या नोंदीकरिता येत आहेत. झाडाची छायाचित्रे खराब येतात. क्षेत्राची नोंद कशी करावी, अशा अनेक कारणांमुळे शासनाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शासनाच्या वतीने आपले प्रतिनिधींकडून शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकाची पाहणी करून नोंदी करून घ्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.