या भटक्या समाजातील लोकांच्या स्थिरतेसाठी घरकूल देण्यात यावे. भटक्या समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती करीत असल्यामुळे पूरक कागदपत्रांची शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता या लोकांकडून पूर्तता होत नाही. अशिक्षित समाजाला कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सोबतच विकासाच्या मुख्य प्रवाहात या समाजाला आणण्याची गरज आहे. त्याशिवाय या समाजाची उदरनिर्वाहासाठी होणारी भटकंती थांबणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
अखिल भारतीय विमुक्त एवम धुमंतु जनजाती वेलफेअर संघ दिल्लीच्या वतीने जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांना याबाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना राज्य महिला सचिव ज्योती पवार, बुुलडाणा जिल्हाध्यक्ष राजसिंह सोळंकी, भानुदास पवार, रोशनी सोळंकी यांच्यासह अन्य उपस्थित होते.