तांदूळवाडी येथे श्रामणेर शिबीर उत्साहात
सिंदखेडराजा : तालुक्यातील तांदूळवाडी येथे सुरू असलेल्या श्रामणेर शिबिराचा समाराेप आणि बाैद्ध धम्म परिषद साेहळा भिक्खू संघाच्या उपस्थितीत २१ फेब्रुवारी राेजी पार पडला. या साेहळ्याला भिक्खू प्रा.डाॅ.सत्यपाल महाथेराे उपस्थित हाेते. सूत्रसंचालन मधुकर शिंदे यांनी केले.
अंगणवाडीसेविकेचा माेबाईल लंपास
अंढेरा : अंत्री खेडेकर प्राथमिक आराेग्य केंद्रात काेरेाना संसर्ग राेखण्यासाठी अंगणवाडीसेविका व आशा कर्मचाऱ्यांची बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीतून एका अंगणवाडीसेविकेचा माेबाईल लंपास करण्यात आला. याप्रकरणी अंगणवाडीसेविकेने अंढेराे पाेलिसांत तक्रार दिली आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
देऊळगाव राजा : शहर व ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर महसूल आणि पाेलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत १०३ जणांकडून २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागिरकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अरुण पाेफळे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
बुलडाणा : शिवसेना वैद्यकीय आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी अरुण पाेळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केली. त्यांना नुकतेच मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
वीज कनेक्शन ताेडल्यास आंदाेलनाचा इशारा
देऊळगाव राजा : काेराेनामुळे आधीच शेतकरी व सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात वीज वितरण कंपनी वीजदेयक न भरल्यास वीज कनेक्शन ताेडण्याची धमकी देत आहे. त्यामुळे, शासनाने त्वरित वीजबिल मागणी थांबवावी, तसेच वीज कनेक्शन ताेडल्यास आंदाेलन करू, असा इशारा भााजयुमाेचे प्रदेश उपाध्यक्ष विनाेद वाघ यांनी दिला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये बेफिकीरी वाढली
बुलडाणा : काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील शासकीय कार्यालयांत बेफिकिरी दिसून आली. प्रमुख सरकारी कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझर, तापमान मोजण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आले.
भास्करराव देशपांडे यांना अभिवादन
बुलडाणा : संघमय जीवन जगणारे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व. भास्करराव देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गर्दे वाचनालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, ॲड. शंतनू काळकर, सुरेखाताई खोत आदी उपस्थित हाेते.
कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांना हाेणार शिक्षा
लोणार : मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात कारवाई सुरू झाली आहे. यावेळी कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप केल्यास त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिला आहे.