सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीमध्ये सध्या या वनस्पतींची रोपे उपलब्ध असल्याचे डॉ. गजानन पडघान यांनी सांगितले.
दरम्यान, तुळस, अश्वगंधा, गुळवेल, अद्रक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहेत.
--गुळवेल संवर्धनाला प्राधान्य--
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात गुळवेल वनस्पतीच्या संवर्धनाला सध्या प्राधान्य देण्यात असून जुन्या जाणकार व्यक्तींकडून परिसरातील कडुनिंबाच्या झाडावर गुळवेल चढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. कडुनिंबाच्या झाडावरील गुळवेल ही अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे खामगाव परिसरात गुळवेल संवर्धनाचे काम श्रीकृष्ण लांडे यांच्यासह काही नागरिकांनी हाती घेतले आहे.
--प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त--
तुळस, अश्वगंधा, गुळवेल, अद्रक हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. जिल्ह्यात त्याची सार्वत्रिक उपलब्धता आहे. यासोबतच लवंग, कापूर, ओवा आणि त्यावर नीलगिरीचे दोन थेंब तेल टाकलेली एक पुरचुंडी सोबत ठेवून किमान दोन तासांनी सुंघावे.
(डॉ. गजानन पडघान, राष्ट्रीय प्रवक्ता, निमा संघटना)