राज्य सरकारकडून काेरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, केरळ सरकारने नियोजनबद्धरीत्या उपाययोजना केल्याने मृत्युदरात मोठी घट झाली आहे. तेथील सरकारने प्रभागनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. कोरोनावरील लसीकरणातही केरळ राज्याने आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारकडून केरळ राज्यासाठी ७३ लाख ३८ हजार ८०६ लसींचे डोस उपलब्ध झाले. मात्र, तेथील आरोग्ययंत्रणेने एकही डोस वाया न घालविता ७४ लाख २६ हजार १६८ नागिरकांना लस दिली. याचा अर्थ तेथील यंत्रणेने अतिरिक्त ८७ हजार ३५८ नागरिकांना लस दिली. कोरोनाच्या संकट काळात मोफत वीज, पाणी आणि प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे केरळ राज्याचा पॅटर्न प्रभावी ठरत असून, हा पॅटर्न बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात यावा, अशी मागणी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:34 AM