डेंग्यूच्या रुग्णात होतेय वाढ
मेहकर : पावसाळ्याच्या दिवसात अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे. तसेच अनेकजण घरातील जलसाठे काेरडे करीत नसल्याने डासांची उत्पत्ती हाेत आहे. मेहकर तालुक्यातील डाेणगाव येथे डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने आराेग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले होते. तालुक्यातही अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते.
गर्दीमुळे संक्रमण वाढण्याची भीती
बुलडाणा : गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवघे तीन ते चार संदिग्ध कोरोना बाधित आढळून येत आहेत. मात्र बाजारातील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. या वाढलेल्या गर्दीमुळे पुन्हा संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.