अमडापूर : येथील शेतकरी बांधवांना अत्यंत उपयोगी पडणारा अमडापूर ते मेडशिंगा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काम बंद पाडले व संबंधित ठेकेदार व उपविभागीय अधिकारी यांना दर्जेदार काम करून देण्याबाबत अनेकदा तोंडी व फोनवर विनंत्या केल्या. मात्र शेतकरी व गावकऱ्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने अखिल ८ मार्च रोजी या शेतकऱ्यांनी बुलडाणा जिल्ह्याधिकारी यांच्या कडे कामाबाबत चौकशी झाल्याशिवाय बिले न देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी केली आहे.
मोहदरी व मेडशिंगा गावातील नागरिकांनी अनेकदा रस्ता मागणी करून वेळोवेळी उपोषण केली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत हा रस्ता मंजूर करण्यात आला. अमडापूर ते मेडशिंगा तब्बल २ कोटी ८४ हजार रुपय किमतीचा ५.७५ कि.मी.चा रस्ता सन २०१९ मधे मंजूर करून कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र हे काम अत्यंत कासव गतीने होत असून, निकृष्ट दर्जाचे केले आहे.हे काम अंदाज पत्रकानुसार केलेल्या गेले नाही. यामध्ये भेसळयुक्त डांबराचा वापर करण्यात आला आहे. सदर हि बाब आम्हा सर्व मेडशिंगा गावकरी व अमडापूर येथील शेतकरी यांच्या लक्षात आले असता. संबंधित ठेकेदार यांचे सुपर वाजझर वानखेडे यांच्या लक्षात आणून दिले व कामाबाबत विचार ना केली असता आम्हा शेतकऱ्यांना उर्मट भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले , सदर कामाची चौकशी करून ठेकेदाराचे संबंधित कामाचे बिल देऊ नये अशी मागणी बुलढाणा जिल्ह्याधिकारी यांच्याकडे १०० ते १५० शेतकरी यांनी सह्या निशी केली आहे. निवेदनावर सागर कदम, गोविंद सोनूने,ग्रा.प. सदस्य दिलीप देशमुख, प्रकाश खराडे, शाम जुमडे, शे.वसिम , सतीश पवनारकर, सुनिल बिरंगळ, सुनिल सोनुने सुमित ढोले, प्रविन देशमुख , कैलास देशमुख, भगवान शेजोळ माजी सरपंच मेडशिंगा, उमेश जाधव, अशोक जैस्वाल यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.