मुंबई येथे त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. सध्या जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या व बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. डीएपीची बॅग १५०० वरुन १९०० रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे एका बॅगमागे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. एनपिकेच्या किमतीत आधी ३०० रुपयांनी, तर आता ५० रुपयांनी वाढ झाली. युरियाचा भाव २६६ रुपये कायम आहे. बियाणशंच्या किमतीतही वाढ होत असून, शेतकऱ्यांसमोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. विदर्भात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, मका ही पिके घेतली जातात. याचा विचार केल्यास युरियाच्या किमती कायम राहण्याचा फारसा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होत नाही. युरियासोबतच डीएपी आणि एनपीके १२-३२ या खतांच्या किमतीसुद्धा कमी करण्यात याव्यात, बुरशीनाशक कल्चर मशीन हेसुद्धा टेक्निशियनअभावी वापरले जात नाही आणि ही यंत्रणा धूळ खात पडली आहे. त्यामुळे तालुकास्तरावर या प्रमाणाच्या मूल्यांकनासाठी तसेच कल्चर मशीनसाठी टेक्निशियन नेमण्यात यावे, निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून झालेली आर्थिक घसरण पाहता, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आणि महाराष्ट्राला हे परवडणारे नाही. त्यामुळे बियाणां किमती कमी करून, उच्च प्रतिची उगवण क्षमता असणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, खत व बियाणांच्या लिंकिंगवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक नेमण्यात यावे, आदी मागण्या जयश्री शेळके यांनी कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
पेरणीसाठी कृषी केंद्रांना लॉकडाऊनमधून सवलत द्या
कपाशीच्या औषधींच्या किमती कमी करण्यात याव्यात, मागील वर्षभरापासून सातत्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी लॉकडाऊनचा उपाय अवलंबिला जात आहे. शेतकऱ्यांना पेरणी करता यावी, यासाठी कृषी केंद्रांना लॉकडाऊनच्या नियमांमधून सवलत देण्यात यावी, अशी मागणीही शेळके यांनी केली आहे.