सुलतानपूर : काेराेना महामारीच्या परिस्थिती सर्वसामान्य जनतेला प्रचंड आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक संस्था मात्र नेहमी प्रमाणे पूर्ण फी वसूल करीत आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फी कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे गत वर्षापासून शाळा बंदच आहेत. इतर उपक्रम बंद असतानाही खासगी इंग्रजी शाळांनी मात्र पालकांकडून पूर्ण फी वसुली सुरू केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने खासगी शाळांना फी कमी करण्याचे आदेश द्यावे, अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नवीन घायाळ, हर्षल पाटील, शुभम सिरसाट, सुरज साठे, वसीम पहेलवान, चित्रांक काटकर, गोपाल साठे, ओम अवसरमोल, वैभव पनाड, प्रसन्नजित पनाड आदींची स्वाक्षरी आहे.