गेल्या दोन वर्षांपासून बुलडाणा जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समिती स्थापन झालेली नाही. २०१९ व २०२० या दोन वर्षांपासून सर्व वृद्ध कलावंतांचे अर्ज बुलडाणा येथे धूळखात पडलेले आहेत. दरवर्षी नवीन अर्ज सादर करावे लागतात. त्याचा खर्च ही वाढतो, म्हणून दरवर्षी जे १०० अर्ज घेतले जातात ते घेतले जात नाहीत. कोरोनामुळे सर्व कलावंतांचे कार्यक्रम बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याकरिता वृद्ध कलावंत मानधन समितीची लवकरात लवकर स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शाहीर कलावंत काशिनाथ फुलमाळी, बाबुराव बरडे, कयुम खान पठाण, विठ्ठल कोल्हे, एकनाथ बुरकुल, अंकुश एडके, प्रमोद कंकाळ, प्रकाश एडके, गजानन मोरे, अशोक मुख्यदल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वृद्ध कलावंत मानधन समिती स्थापना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:30 AM