पिंपळगाव सराईसह रायपूर परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आह़े त्यामुळे, अनेक जण रायपूर येथे तपासणीसाठी जात आहे़ रायपूर प्राथमिक आराेग्य उपकेंद्रात रॅपिड टेस्ट करण्यात आल्या हाेत्या़ काही संदिग्ध रुग्णांना आरटीपीसीआर तपासणी करण्याचा सल्ला आराेग्य विभागाकडून मिळत आहे़ रायपूर येथे ही तपासणी हाेत नसल्याने बुलडाण येथील अपंग शाळेतील काेविड सेंटरला रुग्णाला पाठविण्यात येते़ तेथेही अनेकांची तपासणी केली नसल्याने रुग्णांची भटकंती हाेत आहे़ गावातील काेराेना रुग्णांची संख्या पाहता गावातच आरटीपीसीआर टेस्ट सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे त्वरित रिपोर्ट येण्यासाठी रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत़ रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचण्या पुन्हा सुरू करण्यात येतील़
डाॅ़ प्रशांत बडे, तालुका आरोग्य अधिकारी,बुलडाणा