कित्येक वर्षांचे जुने बांधकाम असलेल्या इमारतींना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात अशा इमारती पडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशात पावसाळा बघता नगर परिषदेच्या नगर रचना विभागाने अशा जीर्ण इमारतींपासून जीवित व वित्तहानी घडू नये यासाठी शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून या इमारती जमीनदोस्त करण्यात यावा जेणेकरून जीवित हानी होणार नाही. शहरातील अनेक भागांमध्ये जीर्ण झालेल्या इमारती पडक्या अवस्थेमध्ये असल्याने या अशा जीर्ण इमारत किंवा त्यांचा धोकादायक स्थितीत आलेला भाग पाडून जेणेकरून इमारतीत राहणाऱ्यांना किंवा रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना त्यापासून धोका होणार नाही. आतापर्यंत पावसाने आपले रूप दाखविले नाही. मात्र, येत्या काळात पाऊस बरसणार व तेव्हा अशा इमारतींपासून धोका होऊ नये म्हणून नगर रचना विभागाने आता अशा जीर्ण इमारत मालकांना सूचना देऊन आपल्या जीर्ण झालेल्या इमारती जमीनदोस्त करण्यात शहरातील नगर परिषद हद्दीतील जागेमध्ये विद्युत पोल व विद्यूत रोहित्र बसविण्यात आली आहे. यांना कर लावण्यात यावा. शहरातील विद्यूत लोंबलेल्या तारापासून नागरिकांना जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तत्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आबेद खान, ज्योत्स्ना सरदार यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे.
शहरातील धोकादायक झालेल्या इमारती तत्काळ जमीनदोस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:37 AM