देऊळगावराजा : येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषीकार्यानुभवाअंतर्गत कृषी दुतांनी तालुक्यातील निमखेड येथील शेतकऱ्यांनामाती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करुन दाखवित माती परिक्षणाचे महत्वशेतकऱ्यांना पटवून दिले.यावेळी मातीचा नमुना कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा व नंतर तोप्रयोगशाळेत कसा पाठवावा याबद्दल शेतकऱ्यांना कृषीदुतांनी सविस्तरमार्गदर्शन केले. तसेच नमुना तपासून आल्यानंतर कोणते घटक व रासायनिक खतकिती प्रमाणात वापरावे याबाबत माहिती दिली. यावेळी विठ्ठल कव्हळे, नरसिंगकव्हळे, श्रीराम कव्हळे, संजय कव्हळे, दीपक कव्हळे, बबनराव कव्हळे, अंकूशकव्हळे, सुदाम कव्हळे तसेच कृषी दुत हरिदास मुंढे, उमेश पाचपोर, मोहनदासमुंढे, भरत नागरे, विवेक नालिंदे, दत्ता पालवे, अरुण पांढरे, पी.चरित आदीकृषी दूत उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासह महाविद्यालयाचे प्राचार्यनितीन मेहेत्रे, रासेयो समन्वयक प्रा.मोहनजितसिंग राजपूत व प्रा.विलाससातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.(तालुका प्रतिनिधी)
कृषी दुतांनी दिले माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक
By admin | Published: June 26, 2017 1:12 PM