यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र घोषणाबाजी करून राज्य शासनाविरोधात रोष व्यक्त केला. सोबतच गेल्या वर्षभरापासून युवक या परीक्षेची तयारी करीत आहेत. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द न करता नियोजित तारखेलाच परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत विद्यार्थायांनी ही निदर्शने केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली. मागच्या वर्षीही कोरोनामुळे ही परीक्षा रद्द झाली होती, त्यामुळे युवकांनी केलेली तयारी व्यर्थ ठरली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून युवक या परीक्षेची तयारी करीत आहेत. जिद्द, चिकाटी तासंतास अभ्यास करुन सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी या परीक्षेची तयारी केली आहे. परंतु शासनाने ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सलग दोन वर्षे परीक्षा न झाल्याने अनेकांचे वर्षे आणि मेहनत वाया जाण्यासोबतच वयोमर्यादाही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाप्रती विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे न झाल्यास युवावर्ग रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी राणा चंदन यांनी दिला आहे. या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक सहभागी झाले होते.
परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:01 AM