शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

डेंग्यूसदृश तापाने चिमुकल्याचा मृत्यू

By admin | Published: October 02, 2014 11:56 PM

लोणार तालुक्यातील उद्नापूर येथील एका ६ वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू

कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील उद्नापूर येथील एका ६ वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूसदृश ता पाने मृत्यू झाल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, गत काही दिवसांपासून कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे मलेरिया, डेंग्यू, सर्दी, ताप, खोकला यासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. उद्नापूर ये थील ऋषिकेश सुरेश मुळे (६) याला ताप आल्यामुळे त्याला मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान ऋषिकेश मुळेचा मृत्यू झाला. त्याचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कोयाळी व उद्नापूर येथील अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. येथील रुग्णांवर मेहकर, वाशिम, औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. परिसरात सुरू असलेल्या डेंग्यूसदृश तापेच्या साथीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याकडे आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. येथे आरोग्य सेवक नसल्यामुळे गावात शासकीय औषधी व आरोग्य सुविधा मिळत नाहीत. गावातील नाल्या जमीनदोस्त झाल्या असून, ग्रा. पं. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने मच्छरांचा वावर वाढला आहे. पिण्याच्या पाण्यामध्येही ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नाही. तसेच आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासल्या जात नसल्याने कोयाळी व उद्नापूर येथे मलेरिया, डायरियासारख्या रोगाचे सत्र सुरूच आहे. कोयाळी-उद्नापूर येथे सद्य:स्थितीत आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी उद्नापूर येथील देविदास मुळे यांच्यासह ग्रामस्थांमधून होत आहे.