जिल्ह्यातील एकूण एसटी आगार - ७
एकूण कर्मचारी - २८००
महिन्याला पगारावर होणारा खर्च - २५००००००
सध्याचे रोजचे उत्पन्न - ३००००
कर्मचाऱ्यांचे पगार झाले
एसटी महामंडळाचे उत्पन्न अत्यंत कमी झाले असले, तरी सर्व कर्मचाऱ्यांचे मागील महिन्याचे पगार पूर्ण करण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांना पगारासाठी ताटकळत ठेवण्यात येत नाही. एसटी महामंडळाची थकबाकी सध्या राहिलेली नाही.
ए. यू. कच्छवे, वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.
कर्मचारी आर्थिक अडचणीत
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अगोदरच पगार कमी आहेत. त्यातही ज्या महिन्यात पगार लांबले त्यावेळेस कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगार होत आहे. परंतु याबाबत काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली.
थकबाकी वसूल
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी महामंडळाने इतर विभागांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यास सुरुवात केली होती. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाची सर्व थकबाकी वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक विभाग व इतर काही विभागांकडे असलेली थकबाकी आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही होऊ शकले.