सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी विमा मिळवण्यासाठी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील दुसरबिड, मलकापूर पांग्रा, शेदुर्जन, साखरखेर्डा, किनगाव राजा , सोनशी व सिंदखेडराजा या सातही मंडळांत अतिवृष्टी झाली होती. सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, तूर हे पिके उद्ध्वस्त झाली होती. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. १०५ गावांची आणेवारीही ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी यांना पीक विमा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जोर धरीत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची संबंधित कंपनीकडे पिकांच्या नुकसानीची तक्रार केली होती, त्यांना आर्थिक मदत मिळणारच; पण ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही, त्यांनाही महसूल, कृषी व पंचायत यांच्या पीक कापणीच्या अहवालानुसार हा आवाहन कृषी आयुक्तांकडे पाठविला आहे.
वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा
पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी लवकरात लवकर चर्चा करून पीक विमा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री