देऊळगावराजा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी १९ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यक र्त्यांना डावलले असल्याने दे.राजा शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. जोपर्यंत प्रशासकांची पदे रद्द होत नाही, तोपर्यंत पक्षाचा आदेश न मानता विधानसभा निवडणुकीत विरोधी काम करू, असा इशारा देऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांविरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक विश्रामगृह येथे आज १६ जुलै रोजी काँग्रेस पदाधिकार्यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस प्रदीप नागरे, माजी जिल्हा उ पाध्यक्ष डॉ.इकबाल कोटकर, व्हीजेएनटी सेलचे तालुकाध्यक्ष रामदास डोईफोडे, शहराध्यक्ष हनिफ शाह, सेवादलाचे तालुकाध्यक्ष गजानन तिडके, तालुका उपाध्यक्ष सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.या बैठकीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ५ कार्यकर्त्यांना बाजार समितीच्या प्रशासकपदाची संधी दिली आहे. हे पद रद्द करून ६0:४0 च्या सूत्रानुसार काँग्रेसला संधी मिळावी, अशी मागणी या बैठकीत केली.
प्रशासकांची निवड रद्द करा
By admin | Published: July 17, 2014 12:00 AM