शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पाणी असूनही सुटाळा तहानलेलाच!

By admin | Published: November 05, 2014 11:49 PM

खामगाव तालुक्यातील प्रकार, १३ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प.

खामगाव (बुलडाणा) : स्थानिक एकता कॉलनी, ओमनगर, प्रशांतनगर आदी परिसरासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी असूनही उपरोक्त परिसरात मागील १३ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहराला लागून असलेल्या तायडे कॉलनी, एकता कॉलनी, प्रशांतनगर, राठी ले-आउट, ओमनगर आदी परिसरासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास ६0 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण होऊन चाचणीच्या नावाखाली मागील तीन वर्षांपासून सदर परिसराला दे धक्कानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. सदर योजनेसाठी नेमलेल्या पाणीपुरवठा समितीने वारंवार सदर योजना ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावी, याकरिता प्रयत्न केले आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या ढेपाळलेल्या नियोजनामुळे सदर योजना हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे कधी तीन दिवसाआड, तर कधी १0 दिवसांनंतर पाणीपुरवठा होत होता. विशेष म्हणजे, एकता कॉलनी, राठी ले-आउट, ओमनगर, प्रशांतनगर परिसरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून, या ठिकाणी ३00 फुटांपर्यंंत बोअर करूनसुद्धा पाणी लागत नाही. परिसरात बहुतांश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांना बोअरवेल करण्याचा खर्चसुद्धा परवडत नाही. परिणामी त्यांना पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, १५ वर्षे जुन्या या परिसरात ग्रामपंचायतद्वारा एकही हातपंप बसविण्यात आला नाही. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु, जवळपास विहीरही नसल्याने नाइलाजाने २0 रुपये ड्रम किंवा १२0 रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे.