लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: एक संवेदनशील शहर म्हणूनच ‘खामगाव’ला ओळखल्या जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या शहरातील नागरिकांनी आपला ‘इतिहास’बदलला. शहराची ‘शांती’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्व-धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहेत. ही सकारात्मक आणि आनंददायी बाब असल्याचे शहरातील सर्व धर्मिय नागरिकांनी ‘अधोरेखीत’ केले.
धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या शनिवारी सायंकाळी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा पार पडली. या सभेतील मान्यवरांच्या मनोगतांचे ‘चिंतन’ आणि ‘मंथन’ केल्यास; ही सभा की साहित्य मैफल असाच प्रश्न अनेकांना पडवा!
प्रत्येकाला सकारात्मकतेच्या एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवणारी उच्च कोटीची ‘शांती प्रिय आणि कुटूंब वत्सल’सदस्यांचीच ही ‘मैफल’ असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरणार नाही. शांतता समिती सदस्यांपासून तर व्यासपीठावरील मान्यवरांपर्यंत प्रत्येकानेच या सभेला आपल्या पराकोटीच्या सकारात्मक विचारांनीच एक वेगळीच उंची मिळवून दिली. शांतता समितीच्या सदस्यांच्या विचारांनी आपण भारावलो आहोत; यापुढे शांतता समितीची सभा नव्हे, तर कुटुंब वत्सल शांती प्रिय सदस्यांची ‘बैठक’असाच उल्लेख या सभेचा करावा. अशी आपली रास्त आणि जाहीर अपेक्षा मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी याठिकाणी व्यक्त केली. भगवत गीतेतील श्लोकांपासून तर उत्कृष्ट हिंदी-उर्दू शेरो शायरींची संहिताच ही मैफल ठरली. मौलवी युनूस यांनी ‘किसीका प्यार भरा, दिल मत तोडो!’ या शेराने मैफलीला उंची पोहोचविली. ज्येष्ठ साहित्यीक रामदादा मोहिते यांनी प्रार्थना आणि दुवेसाठी उठणारे दोन्ही हात एकच आहे. जोडले तर प्रार्थना आणि फैलविले तर दुवा! असा ‘सरळ-सरळ’ संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. साहित्यिक मुक्तेश्वर कुळकर्णी यांनी सर्वांच्या विचारपुष्पांना दुजोरा दिला. शांतता समिती सदस्य आणि प्रज्ञावंतांच्या सोबतीला येत प्रशासकीय अधिकाºयांनीही ही मैफल गाजविली. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सभेच्या सुरूवातीलाच लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना श्रध्दांजली अर्पण करून आपल्या कृतज्ञतेचा परिचय दिला. साध्या अडचणीसाठीही भेट घ्या, व्हॉटअप संदेश द्या, असे आवाहन करीत आपली सहज उपलब्धता स्पष्ट केली. त्याचवेळी नियम मोडणाºयांविरोधात प्रशासन आपली कारवाई करेल! असा गर्भीत इशारा दिला. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ असाच सार जिल्हाधिकाºयांच्या खामगावातील पहिल्याच ‘संवादा’चा होता.
धाकदपट करून रूबाब दाखविणारा. एकाद्यावेळी दंडुक्याचा प्रसाद देणारा अशीच छबी आजही समाजमनात आहेत. पोलिस निरिक्षक तर त्यापेक्षाही कितीतरी पटीने पुढे आहे. मात्र, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक देशमुख यांनी पोलिसांबद्दलचा हा समज खोडून काढला. बहारदार संचालनाने त्यांनी कार्यक्रमाला आपल्या शैलीतून उंची मिळवून दिली. शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांचे उत्कृष्ट ‘इव्हेंट’ मॅनेजमेंट या सभेत दिसून आले. त्यांना ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख आणि सहकाºयांची साथ मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविकातून भूमिका विषद केली. तर अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांचे या संपूर्ण सभेच्या नियोजनामागील ‘नियंत्रण’दिसून आले.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गाजविली सभा!
नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी शनिवारी पहिलीच सभा गाजविली. आपल्या भाषणात त्यांनी शेरो शायरी आणि साहित्यांची गुंफन करीत विचार प्रक…