लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये काही उमेदवारांचा काठावर विजयी झाला तर काही उमेदवारांनी भरघोस मताने आघाडी मिळवली.शनिवारी मतदान झाल्यानंतर एकूण २२ हजार २४८ मतदारांपैकी १८ हजार २६८ मतदारांनी मतदान केले होते. १७ ग्रामपंचाय तींसाठी एकूण ८२.११ टक्के मतदान झाले होते. सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. ट पालाची मते मोजल्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळेस सरपंचपद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने प्रचंड उत्सुकता होती. या टप्प्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सिनगाव जहागीर येथील लढतीकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागून होते. सरपंच पदाच्या उमेदवार लता प्रकाश गीते यांनी तालुक्यातील सर्वात मोठी आघाडी घेऊन सुनीता गजानन डोईफोडे यांचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. एवढेच नव्हे तर सदस्यांच्या ११ जागांपैकी दहा जागा जिंकत पॅनेलची धुरा सांभाळणारे प्रकाश गिते व गजानन पवार यांनी राजकीय कौशल्य सिद्ध करत सिनगाव जहागीरचा गड काबीज केला आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांच्या पॅनेलच्या सरपंच पदाचे उमेदवार माधव मार्तंडराव शिंगणे अवघ्या एका म तांनी विजयी झाले. गारगुंडी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गजानन दिनकर काकड ६0 मतांची आघाडी घेऊन सरपंचपदी विजयी झाले. तालुक्यातील १९ ग्राम पंचायतनिहाय विजयी सरपंच व सदस्य याप्रमाणे आहेत. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक बाजड, निवासी ना. तहसीलदार मदन जाधव, ना. तहसीलदार प्रशांत जाधव, सचिन सावंत, एम.के.पवार, निवडणूक विभाग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. उपविभा. पो.अ. भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सारंग नवलकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तहसील कार्यालयातील मतमोजणी कक्ष व आवारात तैनात ठेवल्याने शां ततेत निकालाची प्रक्रिया पार पडली.
देऊळगावराजा : काहींचा काठावर विजय, तर काहींची भरघोस मताने आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:22 AM
देऊळगावराजा: तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण झाली. दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडल्याने प्र त्यक्षात सतरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये काही उमेदवारांचा काठावर विजयी झाला तर काही उमेदवारांनी भरघोस मताने आघाडी मिळवली.
ठळक मुद्देसतरा ग्रामपंचायतींसाठी पार पडली निवडणूकदोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध