यावेळी रा. कॉ. युवक जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे,सरपंच रामकिसन म्हस्के, सुनील मोरे, रवींद्र शिंगणे,गजानन खरात,पत्रकार संतोष जाधव,रामू शिंगणे,अनिरुद्ध शिंगणे, उमेश शिंगणे,कैलास राऊत,काळे गुरुजी,भगवान शिंगणे,मो.आशिक,अशोक पाबळे,भगवान चंद,बलिराम शिंगणे,विशाल उबरहंडे,दिनेश खेत्रे,शिवप्रसाद शिंदे,प्रमोद शिंगणे,गजानन पाटील शिंगणे,वायाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.पुढे बोलताना पठाण म्हणाले अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे देखील मतदार संघात पूर्णपणे लक्ष असून मतदार संघात बरेच विकासकामे सुरु आहे. मतदार संघाच्या विकास कामासाठी कुठलीही निधी कमी पडू देणार नाही. सध्या कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे नामदार डॉ. शिंगणे नागरिकांच्या जीवाची काळजी घेत आहे. आरोग्य यंत्रणा सोबत नेहमी संपर्कात राहून अनेक समस्यांवर काढत असल्याचे सांगितले. (वा़ प्र )
देऊळगाव मही जिल्हा परिषद सर्कल विकासाच्या दिशेने- रियाजखाँ पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:34 AM