शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

मोताळय़ाचा विकास रखडला

By admin | Published: December 31, 2014 12:25 AM

कायमस्वरुपी पद भरण्याची मागणी.

मोताळा (बुलडाणा): गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला असला तरी तालुका असलेले मात्र नगरपालिका नसलेले एकमेव गाव आहे. येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फतच चालविल्या जातो, त्यामुळे मोताळय़ाच्या विकासाची सारी भिस्त ही ग्रामपंचायतीवरच आहे; मात्र एवढय़ा मोठय़ा ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी लागणारा ग्राम सचिव नाही. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. या तालुक्याच्या विकासाचे चित्र हे इतर १२ तालुक्याच्या दृष्टीने खेड्यातच जमा असल्याने मोताळय़ाच्या विकासासाठी शासन कधी पुढाकार घेणार, हा प्रश्नच आहे. मागासलेला तालुका म्हणून ठपका बसलेल्या मोताळा या शहराला गाव म्हटले तरी अनेक अडचणी समोर येतात. गावाच्या विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते; मात्र अनेक दृष्टीने विकासाची कामे अडली आहेत. येथील बाजार हर्रासी जाहीर स्वरूपात प्रतिवर्षी केली जात नाही. मागील तीन वर्षांची सरासरी काढून हर्रासी दिल्या जाते, त्यामुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होते. हीच बाजार हर्रासी प्रतिवर्षी केल्या गेली तर ग्रा.पं.ला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वसुलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. बाजारातील वाढत्या अतिक्रमणाला ग्रामपंचायत प्रतिबंद घालू शकत नाही. नाल्याची साफसफाई वेळेवर केल्या जात नाही. स्मशानभूमीची देखरेख व दुरूस्तीची कामेसुद्धा ग्रामपंचायतीकडून केल्या जात नाही. मोताळय़ातील बाजार हा जिल्हय़ातील सर्वात मोठा बाजार; परंतु येथे बैठक व्यवस्थेचे नियोजन नाही. गावामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना जसे तंटामुक्ती, हगणदरीमुक्त गाव, ग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन योजना तसेच मनरेगाच्या कामात कोणतीही प्रगती दिसून येत नाही. अतिरिक्त आवकअभावी या गावाचा विकास खुंटला आहे.