कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली असून, तेव्हापासून एकूण सात सदस्यांपैकी चार सदस्य आहे. विनाकारण गावाचे विकास कामासाठी अडथळा निर्माण करीत असून, कोणतेही ठोस कारण नसताना, मंजूर झालेल्या विकासकामांना अडथळा निर्माण करून कामे मासिक सभेत नामंजूर करीत आहेत. आपण अनुसूचित जातीतील महार प्रवर्गातून असून, हे सदस्य जाती द्वेषातून त्यांना विकास कामे करण्यासाठी मदत न करता अडथळा निर्माण करत आहेत, तसेच चारही सदस्य सरपंच यांना ग्रामपंचायतीमध्ये तुच्छ व हीन दर्जाचे वागणूक देतात, असा आरोप त्यांनी केलेला आहे. एखादा ग्रामपंचायत सदस्य विनाकारण गावाचे विकास कामांमध्ये अडथळा आणत असेल, तर त्यास अनर्ह ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमात आहे. या सदस्यांची चाैकशी करून, ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वैशाली कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
गावात लाखाेंची कामे मंजूर
आतापर्यंत त्यांनी स्वच्छ भारत मिशनमधील ७ लाख रुपयांचे सार्वजनिक शौचालय, शाळेसाठी ५ लाख रुपयांची संरक्षण भिंत, १४व्या वित्त आयोगातील ८ लाख रुपयांची विविध कामे, महादेव मंदिर संस्थानाच्या संरक्षण भिंतीचे काम, सुलतानपूर ते बायगाव रस्ता डांबरीकरण ठराव, तांडा वस्तीची १० लाख रुपयांची कामे इत्यादी कामे त्यांनी नामंजूर केलेली आहे.