लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : देवालय ग्रामासी प्रत्यक्ष आला, जाणे न लागे गिरीला हे स्थान प्रत्यक्ष असे न माने अधोगती लागे तयशी जाणे!!!विदर्भाचा तिरूपती बालाजी म्हणून लाखो भाविकांच्या मनात अतूट श्रध्दास्थान व जागृत देवस्थान म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात असलेल्या श्री बालाजींची जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर किर्ती आहे.श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्रींच्या मुर्तीची नगर प्रदक्षीणा म्हणजेच अत्यंत महत्वपुर्ण असणारा पालखी सोहळा यावर्षी भक्तीभावाने पार पडत असताना सलग वीस तास रंगला. वर्षातून एकदाच श्री बालाजी महाराजांची नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर काढून अठरापगड जातीधर्माच्या लोकांना प्रत्यक्ष मुर्तीला हात लावून दर्शन घेण्याची संधी मिळत असल्याने हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेवून मंत्रमुग्ध झाले. २१ सप्टेंबरला घटनास्थापना झाली. विजयादशमी म्हणजेच दसºयाच्या पुर्वसंध्येला मंदिरासमोरच्या फरसावर लाटांसह मंडपोत्सवाची उभारणी २९ सप्टेंबरला झाली. दसºयाच्या मध्यरात्री १२ वाजता बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह मानसिंग जाधव यांच्याहस्ते गाभाºयात श्रींची आरती झाल्यानंतर विधिवत श्री बालाजी महाराजांची मुर्ती मंदिराबाहेर काढून आकर्षक सजवलेल्या पालखीमध्ये विराजमान करण्यात आली. रात्री बाराच्या नंतर नगर प्रदक्षिणेसाठी पालखीला ‘बोल बालासाहेब की जय, लक्ष्मी रमण गोविंदा..’ च्या जयघोषात भक्तीभावाने प्रारंभ झाला.फरसावरून पालखी संस्थान आॅफीस, देवीचे मंदिर, मयुरेश्वर मंदिर, मुरलीधर मंदिर, श्रीराम मंदिर, संत सावता माळी चौक, रंगारगल्ली, माळीपुरा, गिरोली वेस मार्गे दोन तासानंतर आमना नदीतील नियोजित बैठकीच्या जागेवर पालखी ठेवण्यात आली. संपूर्ण यात्रा उत्सवात पालखी सोहळा अत्यंत महत्वाचा मानला जातो. यामागचे कारण असे की, जेव्हा देऊळगावराजा बालाजी महाराजांची मुर्ती बाहेर काढल्या जाते. त्याचवेळी तिरूपतीच्या बालाजी महाराजांच्या मंदिराचे दरवाजे बंद होतात. देऊळगावराजाचा बालाजी हा तिरूपतीच्या बालाजीचा मोठा भाऊ आहे व आमना नदीवरील बैठकीच्या जागेवर या दोन भावांची भेट होते, अशी आख्यायिका आहे. ही भेट झाल्यानंतर आमना नदीत आतिषबाजी व रोषणाई होते. यावेळी उपस्थित हजारो भाविक श्रींच्या पुढे नतमस्तक होतात. हेच पालखीचे वैशिष्ट्य साडेतीनशे वर्षापासून भाविकांच्या मनात ठासून भरलेले आहे. म्हणूनच देऊळगावराजा शहर व पंचक्रोशितीलच नव्हे तर जगाच्या काना कोरपºयात असणारा भाविक पालखी सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित राहतात.
देऊळगावराजा नगरीत भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 8:34 PM
विदर्भाचा तिरूपती बालाजी म्हणून लाखो भाविकांच्या मनात अतूट श्रध्दास्थान व जागृत देवस्थान म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात असलेल्या श्री बालाजींची जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर किर्ती आहे.
ठळक मुद्देश्री बालाजी महाराजांचा पालखी सोहळा २० तास रंगलाहजारो भाविकांनी घेतले मुर्तीपूजन