लोकमत न्युज नेटवर्कशेगाव- श्री गजानन महाराज मंदिर औरंगाबाद च्या 500 भाविकांनी श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी पायदळ वारी केली. दिंडी सोबत ढोल , बासरी व झांज या पारंपारिक वाद्य आकर्षण होते. संतनगरी शेगाव या प्रकटभूमीत आज ही दिंडी दाखल झाली. टाळ, मृदंग, अभंग गायनासह दिंडीची अग्रभागी पारंपारिक वाद्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपारिक वाद्य शहरवासी आवडीने ऐकतांना दिसून आले. औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिर अंतर्गत शेगाव पर्यंत दरवर्षी पायदळ वारी काढण्यात येते.यंदा ही वारी आज शेगावी श्रींचे प्रकटभुमीत पोहोचली. वारीतून आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.(शहर प्रतिनिधी)
श्रध्दाभूमी ते प्रकटभूमी भाविकांची पायदळ वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 5:28 PM