बुलडाणा : बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात कलशारोहण, श्रीमुर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमास २५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी जमत आहे. पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवचे अध्यक्ष आचार्य महानुभाव आचार्य लोणारकरबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गोपाल आश्रमात २५ जानेवारीपासून श्री पंचकृष्ण मंदिराचे कलशरोहण, उद्घाटन, श्रीमुर्ती स्थापना, अनुसरण विधी व पंचावतार उपहार कार्यक्रमास सुरूवात झाली आहे. यानिमित्त सव्वा कोटी नामस्मरण यज्ञ, सामूहिक श्रीमद् भगवदगिता ज्ञानयज्ञ सहस्त्र पारायण कार्यक्रम होत आहे. २५ ते २९ जानेवारी दरम्यान दररोज सकाळी धार्मिक कार्यक्रम होतील तर याच सप्ताहामध्ये सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान विविध क्षेत्रातील वक्त्यांची वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने होत आहेत. २५ ते २८ दरम्यान रात्री संगीतमय अलौकीक संगीतलिला कार्यक्रम झाले. यामध्ये प्रवचनकार भीष्माचार्यबाबा महानुभाव (नाशीक) यांचे प्रवचन होणार आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० दरम्यान किर्तनकार कळमकरबाबा महानुभाव (औरंगाबाद) यांचे कीर्तन, ३० जानेवारी रोजी पहाटे ३ ते सकाळी ७.३५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ३१ जानेवारीला पहाटे धार्मिक कार्यक्रमासह १२.३० वाजता भोजन-प्रसादाचे वितरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन पंचकृष्ण प्रबोधन परिषदच्यावतीने करण्यात आले आहे.
बुलडाण्याच्या श्रीगोपाल आश्रमात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 6:02 PM